उत्तराखंड : देवभूमीत तिहेरी संकट; भूस्खलन, बर्फवृष्टी आता भूकंपाचे धक्के

उत्तराखंड : देवभूमीत तिहेरी संकट; भूस्खलन, बर्फवृष्टी आता भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन: देवभूमी उत्तराखंडातील पिथौरागढ येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज रविवारी (दि.२२) सकाळी ८ वाजून, ५८ मिनिटांनी हे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ही ३.८ रिश्टर इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिदू पिथौरागढपासून २३ किमी अंतरावर १० किमी खोलीवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे. भूस्खलन, बर्फवृष्टी आणि आता भूकंपाचे धक्के असे तिहेरी संकट देवभूमीवर ओढावले आहे.

देवभूमीच्या डोंगराळ भागात संकटाचे ढग दिवसेंदिवस दाटतच चालले आहेत. जोशीमठमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन खचण्याची प्रकरणे (भूस्खलन) समोर येत आहेत. तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तराखंड आणि उत्तरेकडील अन्य राज्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबोरबर एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्केही या भागात जाणवत आहेत. यामुळे देवभूमी उत्तराखंडवर अशा अनेक संकटांची टांगती तलवार आहे.

यापूर्वी ९ नोव्हेंबरला पिथौरागढमध्येच ४.३ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यापासून ९० किमी दक्षिण पूर्व नेपालच्या सीमेजवळ होता. उत्तराखंडमधील उत्तरकाशी आणि पिथौरागढचा परिसर हा भूकंपाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असल्याचेही भूकंपविज्ञान केंद्राने म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news