Weather Update : जोशीमठ, केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी | पुढारी

Weather Update : जोशीमठ, केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे अनेक रहिवाशांना स्थलांतरीत केले आहे. तर दुसरीकडे, हिमवर्षाव आणि पावसामुळे तीव्र थंडीची लाट आली (Weather Update) आहे. हिमवर्षावामुळे तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. केदारनाथ धाममध्ये आज (दि. २०) सकाळी बर्फवृष्टी झाली. केदारनाथ मंदिर पूर्णपणे बर्फाने आच्छादले आहे. त्याचबरोबर धनोल्टी, मसूरी आणि पिथोरागढ जिल्ह्यामध्येही बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे हरिद्वार आणि उधमसिंह नगर परिसरात थंडीची लाट आली आहे.

हवामान विभागाने २०, २३, २४ जानेवारीला जोशीमठ, चमोली आणि पिथौरागढमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर राज्याच्या धनोल्टी, गंगोत्री, .यमुनोत्री, हेमकुंड साहिब आणि औली आदी भागात बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

Weather Update : उत्तर भारताला थंडीपासून दिलासा

मागील काही दिवसांपासून शीतलहरीचा अनुभव घेणाऱ्या उत्तर भारताला पुढील काही दिवस दिलासा मिळण्याची शक्यता  (Weather Update)आहे. उत्तर भारतातील बहुतांश भागात आज थंडीची तीव्रता कमी जाणवली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता नाही. आज सकाळी दक्षिण हरियाणा, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशच्या उत्तर भागात आणि बिहारच्या काही भागात शीतलहरची तीव्रता कायम होती. उत्तर मध्य़ प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या दूरदराजच्या भागात किमान तापमान २ ते ५ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

उत्तर -पश्चिम भारताच्या पठारी भाग आणि देशाच्या मध्य आणि पूर्व भागात कमाल तापमान २० ते २४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर १५ ते १८ जानेवारी या कालावधीत राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाच्या उत्तरी भागात तीव्र थंडीची लाट पसरली होती. तर १९ जानेवारीपासून वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे थंडीची लाट कमी झाली आहे.

दरम्यान, पुढील पाच दिवसांत उत्तर भारतात तीव्र थंडीची शक्यता कमी आहे. हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स २० जानेवारीच्या रात्रीपासून ते २६ जानेवारीपर्यंत पश्चिम हिमालयी क्षेत्र आणि २३ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत उत्तर पश्चिम भारताच्या पठारी भागाला प्रभावित करण्याची शक्यता आहे.

परिणामी, २० ते २२ जानेवारीला जम्मू -काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. तर २३ ते २६ जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर या काळात पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

हेही वाचलंत का ? 

Back to top button