पुढारी ऑनलाईन: त्रिपुरातील धर्मनगर शहरात आज दुपारी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल होती. धर्मनगर शहराच्या उत्तर-पूर्वेला ७२ किमी अंतरावर हा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू ४३ किमी खोलीवर होता. आज शनिवारी (दि.९ सप्टेंबर) दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी हा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. (Earthquake in Tripura)
या आधी शुक्रवारी (दि.०८ सप्टेंबर) मोरोक्कोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की यामध्ये ८०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि ६०० हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Earthquake in Tripura)
धर्मनगर हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील उत्तर त्रिपुरा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तसेच त्रिपुरामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. धर्मनगर शहर त्रिपुरा राज्याच्या उत्तर भागात बांग्लादेशच्या सीमेजवळ स्थित असून, ते आगरताळापासून सुमारे १७० किमी अंतरावर आहे. २०११ साली धर्मनगरची लोकसंख्या सुमारे ४५ हजार होती. (Earthquake in Tripura)