Morocco earthquake : मोरोक्कोमध्ये मोठा भूकंप; मोदींकडून शोक व्यक्त, ‘मोरोक्कोला मदत करण्यास भारत तत्पर’ | पुढारी

Morocco earthquake : मोरोक्कोमध्ये मोठा भूकंप; मोदींकडून शोक व्यक्त, 'मोरोक्कोला मदत करण्यास भारत तत्पर'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोरोक्कोमध्ये शक्तिशाली भूकंप झाला आहे. यात किमान २९६ लोक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. (Morocco earthquake)

Morocco earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी (दि.८) रात्री उशिरा शक्तिशाली भूकंप झाला. यात अंदाजे  २९६ लोक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमींचा आकडा अजून स्पष्ट झालेला नाही. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोरोक्कोमध्ये झालेल्या घटनेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे की,” भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद प्रसंगी माझे विचार मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”

हेही वाचा

Back to top button