पुढारी ऑनलाईन: जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी (दि.३०) पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी होती. अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भागात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आठवड्यापूर्वी J&K मध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.
भारतीय मानक ब्युरोने भारतातील क्षेत्रे वेगवेगळ्या भूकंप झोनमध्ये विभागली आहेत. वेगवेगळ्या एजन्सींकडून मिळालेल्या शास्त्रीय माहितीच्या आधारे हे झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये झोन 5 हा सर्वात धोकादायक आहे. शास्त्रज्ञांच्या मते या भागात ९ रिश्टर स्केलवर भूकंप होऊ शकतो. झोन-5 मध्ये संपूर्ण ईशान्य भारत, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश होतो. या भागात वारंवार भूकंप होत असतात.