Earthquake In Delhi: राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के

Earthquake
Earthquake

पुढारी ऑनलाईन: राजधानी दिल्लीत आज ( दि.१५) दुपारी चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीसह, गाझियाबाद,नोएडा आणि हरियाणा या ठिकाणी देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे नागरिकांमध्‍ये घबराट पसरली आहे. (Earthquake In Delhi)

दिल्ली-एनसीआर भागात रविवारी (दि.१५) दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रत 3.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणाच्या फरिदाबादपासून 13 किमी अंतरावर होता. काही भागात भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. मात्र, या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक आपापल्या घरात होते, दरम्यान पृथ्वी हादरताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. (Earthquake In Delhi)

यापूर्वी ३ ऑक्टोबरला भूकंपाचे जोरदार धक्के

मंगळवारी ३, ऑक्टोबर रोजी दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या शहरांमध्येही भूकंप झाला होता. त्यावेळी लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले होते. मंगळवारी(दि.३) दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी तीव्र होती. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, एका तासात देशात तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. देशाच्या पश्चिम भागात ६.३ आणि ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप झाले. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे देखील नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने म्हटले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news