Earthquake in Afghanistan : अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार; मृतांचा आकडा २ हजारांवर

Earthquake in Afghanistan
Earthquake in Afghanistan

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगानिस्तानात शनिवार (दि.७) झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाने हाहाकार उडाला आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने शेकडाे  लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, या प्रलयकारी भूकंपात आत्तापर्यंत २ हजार ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे.  ९ हजार २४० लोक जखमी झाले आहेत. (Earthquake in Afghanistan)

पश्चिम अफगाणिस्तानात शनिवारी ६.३ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहरापासून ४० कि.मी. अंतरावर होता. पहिला धक्का सकाळी ११ वाजता बसला. ६.३ क्षमतेच्या धक्क्याने इमारती हलू लागल्या. त्यानंतर पाठोपाठ तीन तासांत सात धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रताही ४.६ ते ६ रिश्टर इतकी तीव्र होती. (Earthquake in Afghanistan)

या शक्तीशाली प्रलकारी भूकंपाने अनेक मोठ्या इमारती, घरे पत्त्यासारख्या कोसळली याची संख्या १३२९ इतकी आहे. अनेक ग्रामीण व डोंगराळ भागात भूकंपामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या. या घटनांमुळे ढिगाऱ्याखाली अडकल्याने लोकांचा मृत्यू झाला. अजून मदतकार्य सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. (Earthquake in Afghanistan)

अफगानिस्तानातील नसीमा या महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, "भूकंपामुळे हेरात प्रचंड दहशत   निर्माण झाली आहे.लोकांनी त्यांची घरे सोडली आहेत. माझ्यासारखे अनेक लोक रस्त्यावर आले आहेत." रॉयटर्सच्‍या वृत्तानुसार, अफगानिस्तानातील हेरातया शहराला वारंवार हादरे बसत आहेत, असेही म्हटले आहे.

Earthquake in Afghanistan : शक्तिशाली भूकंपात सहा गावे उद्ध्वस्त

अफगाणिस्‍तानचे माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, हेरातमधील भूकंपातील मृतांची संख्या मूळ नोंदवली गेली आहे. सुमारे सहा गावे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

Afghanistan Earthquake: 30 मिनिटांत पाच आफ्टरशॉक

अफगाणिस्तानच्या हेरात शहरात 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, यामध्ये २ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे भूस्खलन आणि इमारती कोसळून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हेरातच्या भूकंपानंतर 30 मिनिटांच्या कालावधीत अनुक्रमे 5.5, 4.7, 6.3, 5.9 आणि 4.6 तीव्रतेचे पाच आफ्टरशॉक बसले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news