दसरा : जाणून घ्या विजय मुहूर्ताची वेळ; ‘या’ वेळी करा नव्या कार्याचा आरंभ

दसरा : जाणून घ्या विजय मुहूर्ताची वेळ; ‘या’ वेळी करा नव्या कार्याचा आरंभ
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आश्विन शुद्ध दशमी तथा दसरा उद्या (बुधवारी) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त सर्वत्र उत्साह, चैतन्य निर्माण होते. कोणतेही कार्य आरंभ करण्यासाठी हा अतिशय शुभ दिवस मानला जातो विजयादशमीचा सण आपणास आनंद देणारा, आपल्या कार्यात विजय प्राप्त करून देणारा आहे. दसर्‍याच्या दिवसातील अकरावा मुहूर्त आहे त्याला विजय मुहूर्त असे म्हटले जाते. बुधवारी ती वेळ साधारणतः दुपारी सव्वादोन ते तीन या दरम्यान आहे. या विजयमुहूर्तावर जर आपण एखाद्या नव्या कार्याचा आरंभ केला तर त्यात निश्चितच विजय प्राप्त होतो, त्यात आपल्याला यश मिळते, असे पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते यांनी आज ( दि. ४ ) 'पुढारी'शी बाेलताना सांगितले.

ओंकार दाते म्हणाले, "आश्विन शुद्ध दशमी तथा दसरा उद्या (बुधवारी) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त सर्वत्र उत्साह, चैतन्य निर्माण होते. कोणतेही कार्य आरंभ करण्यासाठी हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. महिषासूरमर्दिनीने अखंड नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. रामाने रावणाचा वध याच दिवशी केला, असे म्हटले जाते. पाच पांडवांपैकी अर्जुनाने शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे घेऊन याच दिवशी विराट अशा कौरव सेनेचा पराभव केला. असा सर्वत्र विजय देणारा दिवस म्हणून याला विजयादशमी म्हटले जाते.दसर्‍याच्या दिवसातील अकरावा मुहूर्त आहे त्याला विजय मुहूर्त असे म्हटले जाते. बुधवारी ती वेळ साधारणतः दुपारी सव्वादोन ते तीन या दरम्यान आहे."

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा हा दिवस अत्यंत शुभ दिवस म्हणून गणला जातो, असे सांगून श्री दाते म्हणाले, यादिवशी आपण कोणत्याही नव्या कार्याचा आरंभ केला तर त्यात नक्की विजय मिळतो, यश मिळते असे मानले जाते.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news