बिद्री साखर कारखाना आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकणार शड्डू!

Dudhganga Vedganga Cooperative Sugar Factory
Dudhganga Vedganga Cooperative Sugar Factory
Published on
Updated on

मुदाळतिट्टा, श्याम पाटील : दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री ची पंचवार्षिक निवडणूक ही चार तालुक्यातील 218 गावाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या व पंचावन्न हजारांवर सभासद असणा-या होऊ घातली आहे. या निवडणुक आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना शड्डू ठोकणार असुन यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

बिद्रीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी ची फसगत झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता सावध पवित्रा घेताना दिसुन येत आहे. बिद्री साखर कारखाना निवडणूकीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिद्रीची निवडणूक बिनविरोध करावी यासाठी आपण प्रयत्न करू असे खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन केले आहे. याला दुजोरा देत आमदार हसन मुश्रीफ यांनी बिद्री ची निवडणूक बिनविरोध होणार असेल तर आपण सर्वांच स्वागत करु असे सांगताना चार तालुक्यातील 218 गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या 55065 वर्ग सभासद मतदार,तर 1065 बंद वर्ग सभासद संख्या असणाऱ्या विविध राजकीय पक्ष, संघटना,गट असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संधी कशी देणार अन् बिनविरोध कशी होणार याबाबत शंका उपस्थित केली आहे.

मात्र अद्यापही आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपली भुमिका जाहीर केलेली नाही. पण खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर केलेली भुमिका ते स्वीकारतील अशी अटकळ कार्यकर्ते बांधत आहेत.पण उद्धव ठाकरे शिवसेना गट कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.पण राज्यातील महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा असेल तर राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्यात ते पुढाकार घेतील असे स्पष्ट दिसते पण सत्तेत योग्य संधी मिळाली तर वाटाघाटी होतील असे दिसते.

बिद्रीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भुमिका महत्वाची ठरणार आहे. मागील निवडणूक प्रसंगी माजी आमदार के.पी.पाटील यांच्या संपर्कात हे कार्यकर्ते होते हे विश्वसनीय सुत्रांकडून समजते मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयत्या वेळी के.पी.पाटील यांच्याशी भेट घेऊन आपण एकत्र राहु असे सांगितले त्यानुसार त्यांचे सत्तेच सुत जमले.या कारणामुळे शेतकरी संघटना आपोआप बाहेर फेकली गेली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनाशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ या कार्यकर्त्यांना आली.

ज्यावेळी ऊस दराची कोंडी फोडायचे काम के.पी.पाटील यांनी केले दर चांगला दिला त्यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी के पी पाटील व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात अग्रभागी राहिले. बिद्रीच्या ऊस वजन काट्यावर समाधान व्यक्त करीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सहकार्य केले. सध्या आपण कोठे आहोत ते तपासणी गरजेचे असल्याने बिद्री ची निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे

ऊस उत्पादक आमच्या पाठीशी आहे काय…!

आपण फक्त ऊस दर चांगला मिळावा यासाठी आंदोलने करायची व शेतकऱ्यांच्या पदरात चांगला दर मिळवून देण्यासाठी लढायचे तो शेतकरी ऊस उत्पादक सभासद बिद्रीच्या निवडणुकीत आमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे हे पाहायची वेळ आल्यामुळे ही निवडणूक लढवायची असा निश्चय केला आहे.  दरम्यान या संदर्भात लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून व्यापक स्वरूपात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
– अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते 

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news