पुढारी ऑनलाइन डेस्क : Drugs Destroy : गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकूण 12,438.96 किलो 632.68 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज नष्ट केले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गांधीनगरमध्ये ड्रग ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी याविषयावरील प्रादेशिक बैठकीला संध्याकाळी 5 वाजता संबोधित करतील, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
Drugs Destroy : एएनआयने या संबधीच्या वृत्तात म्हटले आहे. आज शाह यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीला गोवा, गुजरात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रशासक आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
परिषदेत प्रदेशिक सुरक्षेबाबत पश्चिम आणि मध्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्यांच्या सुरक्षा आणि तयारीबद्दल अनेक बाबींवर चर्चा केली जाईल.
Drugs Destroy : गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने किमान 75,000 किलो जप्त केलेले मादक पदार्थ नष्ट करण्यासाठी 75 दिवसांसाठी एक विशेष मिशन तयार केले. हे उद्दिष्ट ६० दिवसांच्या आत पूर्ण झाले. आतापर्यंत एक लाख किलोहून अधिक ड्रग्ज आणि अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी, अमित शाह यांच्या उपस्थितीत ईशान्येकडील राज्यांनी गुवाहाटीमध्ये 40,000 हजार किलो किमतीचे ड्रग्स आणि अंमली पदार्थ नष्ट केले होते.
Drugs Destroy : केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर्षी 30 जुलै रोजी चंदीगडमध्ये बटन दाबून 31000 किलोहून अधिक ड्रग्ज नष्ट करून या अभियानाची सुरुवात केली होती.
याच अभियानाअंतर्गत आज गुजरातची राजधानी गांधीनगर येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकूण 12,438.96 किलो 632.68 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज नष्ट केले जातील.
हे ही वाचवा :