Drug Seized Gujarat : द्वारकेत ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात समुद्रकिनारा बनला तस्करीचा मार्ग?

Drug Seized Gujarat : द्वारकेत ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात समुद्रकिनारा बनला तस्करीचा मार्ग?
Published on
Updated on

गुजरात पोलिसांना द्वारका शहरात मोठी कारवाई केली आहे. देशभरात ड्रग्स प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरा झडत असताना गुजरात पोलिसांनी तब्बल ३५० कोटींचा ड्रग्स साठा जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Drug Seized Gujarat) द्वारका शहरात पकडलेल्या ६६ किलो ड्रग्सची किंमत ३५० कोटी असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी गुजरात पोलिसांनी राजस्थानातील एकाला ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा कोणत्या कारणासाठी आणण्यात आला यावर पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, समुद्रामार्गे हा ड्रग्स साठा पुरवला जात असल्याचे पोलिसांकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Drug Seized Gujarat : द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांच्या माहितीनुसार

द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांच्या माहितीनुसार, द्वारका शहराच्या खबालीया हायवेवर आराधना धामच्याजवळ असलेल्या एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्या आरोपीजवळ असलेल्या बॅगेत ड्रग्स असल्याचे आढळून आले. दरम्यान त्या व्यक्तीची कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडे ६६ किलो ड्रग्स आढळले. जवळ जवळ याची किंमत ३५० कोटींच्या आसपास असल्याचे एसपी सुनील जोशी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आरोपीने अद्यापही याबाबत तोंड उघडले नाही. त्याला हा साठा कोठून आला याबाबत विचारल्यास त्याने उत्तर देण्यास नकार दिला. परंतु पोलिसांच्या सुत्रांनुसार हा ड्रग्ससाठा गुजरातच्या समुद्रीमार्गातून आला आहे. गुजरातच्या व्दारका बंदरावर हा साठा आला असल्याचे समजते आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या चपळाईने कारवाई

एसपी सुनील जोशी यांच्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला याबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली होती. एक आरोपी १४ ते १५ किलो ड्रग्स द्वारकापासून ते वांकानेरहून राजस्थानला घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचत आरोपीला आपल्या जाळ्यात पकडत ड्रग्स ताब्यात घेतले आहे. आरोपीजवळ असलेल्या बॅगेत १५ किलो ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे. तर ४५ किलोचा मोठा साठाही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. कच्छच्या मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटी रुपयांची ड्रग्स साठा पकडण्यात आला.

दोन महिन्यांपुर्वी गुजरातमध्ये २१ हजार कोटींचा ड्रग्स साठा जप्त

मागच्या दोन महिन्यांपुर्वी १३ सप्टेंबरला कच्छमधील मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटी रुपयांचे २९८८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा हा साठा टॅल्कम पावडरच्या नावाखाली दोन कंटेनरमध्ये इराणच्या अब्बास बंदरातून अफगाणिस्तानातील कंदहारमार्गे मुंद्रा बंदरात पोहोचला होता. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) या प्रकरणाचा तपास करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news