Drug Case : प्रभाकर, आर्यन, पूजा ददलानी यांची एनसीबी चौकशी

Drug Case : प्रभाकर, आर्यन, पूजा ददलानी यांची एनसीबी चौकशी

Drug Case – कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणासह केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई विभागाने दाखल केलेल्या सहा गुन्ह्यांचा विशेष पथकाने (एसआयटी) तपास सुरू केला आहे. हे पथक आता पंच प्रभाकर साईल याच्यासह आर्यन खान आणि पूजा ददलानी यांची चौकशी करणार असून, सर्वांचे जबाब इन कॅमेरा घेतला जात आहे. (Drug Case)

'एनसीबी' मुंबईचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह 'एनसीबी'ने गेल्या काही महिन्यांत केलेल्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच 'एनसीबी'च्या पंचांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे सहा प्रकरणांचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार या पथकाने नव्याने आपला तपास सुरू केला आहे.

'एनसीबी' पंच प्रभाकर साईल याला आपला जबाब नोंदविण्यासाठी न्यायालयामार्फत समन्स देण्याची शक्यता आहे. यापूर्वीच प्रभाकर साईल याने मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. तर 'एनसीबी'कडून आर्यन खान आणि पूजा ददलानी यांची चौकशी होणार आहे.

येत्या आठवड्यात दोघांकडेही कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच हे पथक क्रूझ टर्मिनल, कॉर्डेलिया क्रूझवर जाऊन येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, 'एनसीबी'च्या पाच सदस्यीय पथकाने याआधी मुंबईत येऊन सलग तीन दिवस तपास केलेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news