पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी -मुंबईने अगदी अखेरच्या क्षणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांचे नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते. (Aryan Khan drugs case) ज्याचे नेत्वृत्व अधिकारी समीर वानखेडे करत होते, असे आयपीयएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सिंह यांनी या प्रकरणाच्या तपासाचे पर्यवेक्षण केले होते. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे -अखेरच्या क्षणी दोन नावे समाविष्ट करण्यात आली तर आणखी काही संशयितांची नावे वगळण्यात आली. (Aryan Khan drugs case)
एनसीबी-मुंबईचे माजी प्रमुख समीर वानखेडे भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी सीबीआयसमोर हजर राहू शकले नाहीत.
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणी प्रतिज्ञापत्रात ज्ञानेश्वर सिंह म्हणाले, "असे दिसून आले की, माहितीच्या नोटमध्ये शेवटच्या क्षणी बदल करण्यात आले होते आणि आरोपी आर्यन आणि अरबाज यांची नावे शेवटच्या क्षणी समाविष्ट करण्यात आली होती आणि इतर काही संशयितांची नावे होती, ती मूळ माहितीच्या नोटमधून वगळण्यात आली आहेत."