गुरुदासपूर सेक्‍टरमध्‍ये ‘ड्रोन’ घुसखोरीचा डाव ‘बीएसएफ’ने उधळला

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाच्‍या (बीएसएफ) गुरदासपूरमध्‍ये सलग दुसर्‍या दिवशी पाकिस्‍तानी ड्रोनने घुसखोरीचा प्रयत्‍न केला. पाकिस्‍तानमधील अमली पदार्थांचे तस्‍कर हेरॉईन आणि शस्‍त्र पुरवठ्याचा हा डाव सीमा सुरक्षा दलाच्‍या जवानांनी हणून पाडला. रविवारी रात्री ड्रोनच्‍या हालचाली दिसताच जवानांनी सुमारे १०० राउंड फायर करुन ड्रोनला पिटाळून लावल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुदासपूर सेक्टरमधील चंदू वडाळा चौकीवर रविवादी ( दि. १८ रात्री ) 10:20 वाजता ड्रोनचा आवाज आला. जवानांनी 26 राऊंड फायर केले. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानात परतले. त्याचवेळी या घटनेनंतर काही मिनिटांनी पुन्हा सकाळी 10:48 वाजता बीओपी कासोवालमध्ये ड्रोनने घुसखोरीचा प्रयत्‍न केला. जवानांनी गोळीबार करून पुन्‍हा एकदा हा डाव हाणून पाडला. या वेळी जवानांनी ७२ राऊंड गोळीबार केला.

ड्रोन घुसखोरीच्‍या प्रयत्‍नानंतर स्थानिक पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम राबवण्यात आल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news