Bhingari movie : डॉ. श्रीराम लागू- निळू फुलेंचा सुपरहिट ‘भिंगरी’ आता ओटीटीवर

Bhingari movie
Bhingari movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील 'भिंगरी' चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर येत आहे. या चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे सुप्रसिद्ध कलाकार असून उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी अनुभवून प्रेक्षक जुन्या आठवणीत गुंग होणार आहेत. ( Bhingari movie )

संबंधित बातम्या 

चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव यांनी केले असून कथा अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी स्वतः लिहिली आहे. दौलतराव पाटील आणि सदा जिवाभावाचे मित्र असून सदाच्या पत्नीसोबत दौलतने संबंध ठेवल्याचे सदाला कळते. तेव्हा संतप्त झालेला सदा दौलतचा बदला घेण्याच्या नादात काय- काय करतो हे चित्रटातून समजणार आहे. ( Bhingari movie )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news