दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांशी संबंध ठेवायचे नाहीत : एकनाथ शिंदे

Dasara 2022
Dasara 2022

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीतून बाहेर पडून वेगळी चूल मांडण्यासाठी शिवसेनेत बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करून आघाडीतून बाहेर पडण्याचे आणखी एक कारण अधोरेखित केले आहे. 'मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते', असा प्रश्न करून याला विरोध म्हणूनच हे पाउल उचलले असून 'यामध्ये आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर' असेही त्यांनी यामध्ये नमूद केले आहे.

गेल्या काही दिवसांसापसुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी टिकणार की तुटणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर या आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडणे का योग्य आहे याबद्दल अनेक कारणे सांगण्यात येऊ लागली. यामध्ये आता शिंदेंच्या या ट्विटमुळे आणखी भर पडली असून 'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर, तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू' असेही विधान शिंदे यांनी केले आहे.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news