Domestic Flight Rate : अबबSS दिल्ली-मुंबई विमान प्रवास दिल्ली-दुबई पेक्षा जास्त महाग! देशांतर्गत विमान प्रवास भाडे अचंबित करणारे

Iran Israel War
Iran Israel War

पुढारी ऑनलाइन डेस्क : Domestic Flight Rate : देशांतर्गत विमान प्रवास भाड्यांमध्ये ३१ मे रोजी अतिशय आश्चर्यकारक चढ-उतार पाहायला मिळाले. काही विशिष्ट मार्गावरील फ्लाईट तिकीट दर अचंबित करणारे ठरले. दिल्लीहून विविध मार्गांवर जाणाऱ्या फ्लाईटसाठी बुधवारी (३१ मे) १ जून साठी तिकीट बूक करताना म्हणजे २४ तासांपूर्वी बुकिंगसाठी आश्चर्यकारक स्थितीत होते. २४ तास आधीचे तिकीट बुकिंगचे दर काही मार्गांवर उच्चांक गाठताना दिसले. देशांतर्गत फ्लाइटचे तिकीट दर आंतराष्ट्रीय फ्लाईटपेक्षाही अधिक असल्याचे जाणवले. यामध्ये दिल्ली-मुंबई फ्लाईट तिकीटाच्या दराने तर कमालच केली. दिल्ली-मुंबई फ्लाईट तिकीट दर दिल्ली-दुबई फ्लाईट तिकीटांपेक्षाही अधिक होते.

जे लोक बुधवारी (३१ मे) गुरुवारसाठी (दि.१) दिल्ली-मुंबई डायरेक्ट फ्लाईट चे एका मार्गावरील (वन वे ट्रिप) तिकीट बुक करण्यासाठी सर्च करत होते. तेव्हा त्यांना सर्वात स्वस्त दर १९ हजार रुपये (Domestic Flight Rate) इतके दाखवत होते. हे दर दिल्ली दुबई फ्लाईटच्या तिकीट दरांपेक्षा ५००० रुपयांनी अधिक होते. त्याच दिवशी दिल्ली-दुबई फ्लाईटचे भाडे १४ हजार रुपये इतके होते.

Domestic Flight Rate : अन्य मार्गावरील फ्लाईट दराने उच्चांक गाठला

दिल्ली-मुंबई प्रमाणेच दिल्ली-कोचीन एकेरी प्रवासाचे भाडे २२ हजार रुपयांपासून सुरू झाले. कोलकाता-चेन्नई फ्लाईट तिकीट दर सुमारे १४ हजार रुपये इतका होता. शिवाय मुंबईहून वेगवेगळ्या शहरांना जाणाऱ्या फ्लाईटचे २४ तासांपूर्वीचे तिकीट दरही यापेक्षा वेगळे नव्हते. १ जून गुरुवारी मुंबई-लेह फ्लाईट तिकीट दर २२ हजार ५०० रुपये तर कोचीला जाणाऱ्या फ्लाईटचे तिकीट २० हजार रुपये होते. तर या ऊलट नेहमी पूर्व आणि उत्तरेत जाणाऱ्या फ्लाईटचे जास्त असणारे तिकीट दर काल स्वस्त होते.

Domestic Flight Rate : या कारणांमुळे महागला देशांतर्गत विमान प्रवास

देशांतर्गत विमान प्रवासांचे अचानक वाढलेल्या या भाड्याचे प्रमुख कारण GoFirst च्या एक्झिटमुळे मानले जात आहे. असे असले तरी एका एअरलाइनच्या अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे दरवाढीसाठी एवढे एकमेव कारण नाही. तर दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या फ्लाईट तिकीट दरांवर मंगळवारी आलेल्या जोरदार वादळाचा देखील परिणाम झाला आहे. मंगळवारच्या वादळामुळे अनेक उड्डाणे वळवण्यात आली आहेत. तसेच मुंबईला जाणाऱी संख्या खूप जास्त होती. बुधवारी दिल्ली ते मुंबई पुढील तीन दिवसांसाठी एकेरी भाडे अनुक्रमे १३,०००, ११,५०० आणि १०,५०० रुपये होते.

याशिवाय शाळेच्या सुट्ट्या संपत असल्याने लोकांना शाळा सुरु होण्यापूर्वी वेळेत परतायचे असल्याने 'मे' अखेरच्या काळात मागणी वाढते. कोविड साथीनंतर अशा प्रकारे मागणी वाढण्याचे पहिलीच वेळ आहे. या सर्वांचा देखील परिणाम भाडेवाढीवर (Domestic Flight Rate) झाल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पुढे त्यांनी असेही म्हटले आहे, असे असले तरी पूर्व आणि इशान्येकडील नेहमी महागडी असणारी उड्डाणे या काळात स्वस्त झाली आहेत. यामध्ये मुंबई-कोलकाता ७,२०० रुपये, बागडोगरा ८,३०० रुपये इतके होते. मुंबई ते दिल्लीचे भाडे पाहिल्यास तोंडात बोट घालावे लागेल. कारण दिल्ली-मुंबई विमान भाड्याने उच्चांक गाठला असला तरी मुंबई-दिल्ली फ्लाईट तिकीट दर मात्र अगदीच स्वस्त अवघे ४,७०० रुपये इतके होते.

Domestic Flight Rate : प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दरवाढीवर राग व्यक्त केला

प्रवासी महिला श्रूती चतुर्वेदीने दिल्ली ते अहमदाबाद फ्लाइटच्या एकेरी सीटसाठी २१,००० रुपये भरण्याबद्दल ट्विट केले. आणखी एक प्रवासी रोहित वर्माने ट्विट केले की, त्याने दिल्ली ते बेंगळुरूपर्यंत २०,००० रुपये वन-वे दिले.

Domestic Flight Rate : ७ ते १४ दिवसांपूर्वी बुकिंग हा एकमेव उपाय

देशांतर्गत वाढलेल्या विमान प्रवासी भाड्याबाबत बोलताना जाणकारांनी आपले मत मांडले आहे. काही तज्ज्ञांनी ७ ते १४ दिवस आधी तिकीट बुक करणे हाच एकमेव सर्वोत्तम उपाय आहे, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी ३० दिवस आधी बुकिंग करण्याला प्रोत्साहन द्यावे, अशी परिस्थिती नाही असेही म्हटले आहे. कारण ७-१४ दिवस आधीचे बुकिंग आणि ३० दिवस आधीचे बुकिंग यामधील तिकीट दरात फारसा फरक नाही.

उदाहरणार्थ सध्या ८ ते ११ जून दरम्यान आसपासच्या प्रवासासाठी किंवा मुंबई-दिल्ली नॉन स्टॉप फ्लाईटचे (राऊंड ट्रिप) सर्वात स्वस्त तिकीट दर ११ हजार ५०० रुपये इतके आहे. तर ६ ते ९ जुलैसाठी हेच दर १० हजार रुपये इतके आहे. म्हणजेच दरातील फरक अवघ्या दीड हजार रुपयांचा आहे. त्यामुळे ३० दिवस आधी बुकिंग फारसे फायदेशीर दिसत नाही. त्यामुळे बेस्ट रेट (Domestic Flight Rate) मिळवण्यासाठी ७ ते १४ दिवस आधी तिकीट बुक करणे हा एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news