![डोंबिवली : मद्यधुंद डंपर चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2Faccident-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : एका मद्यधुंद डंपर चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) सकाळी कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात घडली. दरम्यान या मद्यधुंद डंपर चालकाने आणखी दोन जणांना धडक दिली. सुदैवाने हे दोघे किरकोळ जखमी झाले.
मिलिंद गडदे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो डोंबिवली येथे राहणारा आहे. खाजगी कंपनीत काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो घरातून आपल्या दुचाकीने कामावर जाण्यास निघाला होता. चिंचपाडा परिसरात रस्त्याच्या कडेला दुचाकीवर उभा असताना ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोळशेवाडी पोलिसांनी डंपर चालक हरिश्चंद्र वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तर डंपर जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का ?