प्रशांत किशोरांनी काँग्रेसला लांबूनच ‘हात’ दाखवला ! पक्षात सामील होण्यास स्पष्ट नकार

प्रशांत किशोरांनी काँग्रेसला लांबूनच ‘हात’ दाखवला ! पक्षात सामील होण्यास स्पष्ट नकार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, दिलेली एम्पावर्ड ॲक्शन ग्रुपचा भाग तसेच निवडणुकीत जबाबदारी स्वीकारण्यासाठी काँग्रेसने दिलेली प्रवेशाची ऑफर मी विनम्रपणे नाकारत आहे. पक्षात सखोल पारदर्शक सुधारणा घडवून आणण्यासाठी माझ्यापेक्षाही अधिक पक्षाला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे.

सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, प्रियंका गांधी, ए के अँटोनी, पी चिदंबरम, मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली, मात्र प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांनी टाळला होता.

प्रशांत किशोर यांच्या तामिळ राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसशी असलेल्या जवळीकीवर ते काहीही बोलणे टाळताना दिसले.

२०२४ साठी एम्पावर्ड ॲक्शन ग्रुप

सखोल सल्लामसलत केल्यानंतर भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक गट तयार केला जाईल, असे सुरजेवाला म्हणाले. १३ ते १५ मे रोजी उदयपूर येथे चिंतन शिबिर होणार आहे. याला नव संकल्प शिबिर असे नाव देण्यात आले असून यामध्ये काँग्रेस पक्षाचे ४०० कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांनी स्थापन केलेल्या आठ सदस्यीय गटाचा अहवाल 21 एप्रिल रोजी पक्षाध्यक्षांना मिळाला होता. ज्यावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी चर्चा केली आणि 'सक्षम कृती गट-२०२४' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

या मुद्द्यांवर चर्चा होणार

शिबिरात कृषी, राजकीय, आर्थिक, संघटनात्मक आदी विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय संघटनेची पुनर्रचना, बळकटीकरण आदी बाबींवरही चर्चा होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्वसमावेशक रणनीतीवर शिबिरात चर्चा होणार आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news