‘द्रमुक’च्या जाहिरातीत चीनचा ध्वज!, भाजपचा जोरदार हल्‍लाबोल

थिरू अनिथा राधाकृष्णन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्‍या (इस्रो) अभिनंदनाची एक जाहिरात प्रसिद्‍ध केली आहे.
थिरू अनिथा राधाकृष्णन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्‍या (इस्रो) अभिनंदनाची एक जाहिरात प्रसिद्‍ध केली आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पुन्‍हा एकदा वादाच्‍या भोवर्‍यात सापडला आहे. पक्षाच्‍या वतीने मंत्री थिरू अनिथा राधाकृष्णन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्‍या (इस्रो) अभिनंदनाची एक जाहिरात प्रसिद्‍ध केली आहे. यामध्‍ये इस्रोच्‍या रॅकेटवर चीनचा ध्‍वज दाखविण्‍यात आला आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी एका जाहिरातीचा फोटो शेअर करून द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) वर जोरदार निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

तामिळनाडूचे मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन यांनी जारी केलेली ही जाहिरातमध्‍ये कुलशेखरपट्टीनम येथील इस्रो स्पेसपोर्टसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची छायाचित्र प्रसिद्‍ध केली. मात्र त्यात अनवधानाने चीनच्या ध्वज असलेले रॉकेट दाखवले आहे.

देशाच्या सार्वभौमत्वाची अवहेलना : भाजप

तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी द्रमुकचा निषेध करत म्‍हटले आहे की, द्रमुकने केलेली चूक देशाच्या सार्वभौमत्वाची अवहेलना आहे. द्रमुकची चीनशी असलेली बांधिलकी स्‍पष्‍ट झाली आहे. द्रमुक हा भ्रष्टाचारावर उंच भरारी घेणारा पक्ष आहे. वास्‍तविकजेव्हा इस्रोच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडची संकल्पना करण्यात आली, तेव्हा तामिळनाडू ही इस्रोची पहिली पसंती होती. मात्र द्रमुकने हे प्रकरण ज्‍या प्रकारे हाताळले ते निराशाजनक होते. आताही द्रमुक फारसा बदलला नाही आणि फक्त वाईट झाला आहे!", असा आरोपही अण्णामलाई यांनी केला.

द्रमुकची घाई ही त्यांची मागील गैरकृत्ये दडपण्याचा प्रयत्न दर्शवते. आपण त्यांना आठवण करून दिली पाहिजे की द्रमुकमुळेच सतीश धवन स्पेस सेंटर आज आंध्र प्रदेशात आहे, तामिळनाडूमध्ये नाही.इस्रोच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडचे नियोजन केले जात होते, तेव्हा तामिळनाडू ही इस्रोची पहिली पसंती होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री थिरू अन्नादुराई खांद्याच्या तीव्र वेदनामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जागी मथियाझगन या मंत्र्यांची नियुक्ती केली होती. इस्रोचे अधिकारी बराच वेळ थांबले. शेवटी मथियाझगन मद्यधुंद अवस्थेत बैठकीला आले. द्रमुकमुळेच आज सतीश धवन स्पेस सेंटर हे आंध्र प्रदेशमध्‍ये आहे तामिळनाडूत नाही, असा टोलाही अन्‍नामलाई यांनी लगावला.

पंतपधांन मोदींही साधला द्रमुकवर निशाणा

आज (दि.२८) तामिळनाडूच्‍या दौर्‍यावर असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावरुन द्रमुकवर जोरदार टीका केली. तिरुनेलवेली येथील जाहीर सभेत बोलताना ते म्‍हणाले, द्रमुक कोणतेही विकास काम न करता खोटे श्रेय घेण्यासाठी पुढे असतो. या पक्षाचे नेते आमच्या योजनांवर त्यांचे स्टिकर्स लावतात हे कोणाला माहीत नाही? मात्र आता त्यांनी मर्यादा ओलांडली आहे, त्यांनी चक्‍क चीनचे स्टिकर चिकटवले आहेत. तामिळनाडूमधील इस्रो लॉन्च पॅडचे श्रेय घेण्‍यासाठी ही धडपड असल्‍याचेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले.

द्रमुक खासदार कनिमोळींनी आरोप फेटाळले

संबंधित जाहिरातीसाठी चित्र कुठून मिळाले, हे मला माहीत नाही. मला वाटत नाही की, भारताने चीनला शत्रू देश म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधान मोदींनी चीनच्या पंतप्रधानांना आमंत्रित केल्याचे मी पाहिले आहे. तुम्ही सत्य स्वीकारू इच्छित नसल्यामुळे, तुम्ही मुद्दा वळवण्यासाठी कारणे शोधत आहात, असे प्रत्‍युत्तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी दिले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news