पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सणातील मोठा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. या दिवशी देवी लक्ष्मी, कुबेर, गणपती आणि सरस्वतीची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी राहावी, आरोग्य आणि शांतता मिळावी यासाठी, दीपोत्सवात संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले जाते. (Diwali Lakshmi Puja) लक्ष्मी पुजनात लाह्या – बताशांचा प्रसाद खूप महत्त्वाचा असतो. फळे, मिठाई, खीर, पुरणपोळ्यांसोबतच लाह्या-बताशे नैवेद्यासाठी ठेवली जातात. यावर्षी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबरला आहे. लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचं विशेष महत्त्व आहे. (Diwali Lakshmi Puja)
संबंधित बातम्या-
लक्ष्मी देवीची आणि गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा, हळद-कुंकू, अक्षता, विड्याचे पान, शेंदूर, सुकामेवा, सुपारी, श्रीफळ, धूप, कापूर, चौरंग, लाह्या, बत्तासे, यज्ञोपवीत, वस्त्र, कलश, अगरबत्ती, दिवा, आरती, कापूस, धागा, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर), गंगाजल, गुळ, फळे, फुले, जव, गहू, दूर्वा, कमळाचे फूल, शंख, आसन, चांदीची नाणी, आंब्याची डहाळे, नैवेद्य, प्रसाद पैसे.
लाह्या या तांदळापासून बनवल्या जातात. महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्यापैकी एक तांदूळ पिक आहे. दिवाळीत भाताचे पहिले पीक येते.