कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून महेंद्र पंडीत यांनी आज (दि. २६) पदभार स्वीकारला. मावळते जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पंडीत यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली.
दरम्यान, कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून महेंद्र पंडीत यांच्या नियुक्तीचा आदेश बुधवारी (दि. २४) सांयकाळी काढण्यात आला होता. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक एकचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.
पंडीत मुंबई येथे आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते. भारतीय पोलिस सेवेचे २०१३ च्या बॅचचे अधिकारी असलेले पंडीत यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून गडचिरोली येथे तर पोलिस अधिक्षक म्हणून नंदूरबार येथे काम केले आहे.
हेही वाचा