कोल्हापूर : महेंद्र पंडीत नवे जिल्हा पोलिस प्रमुख, शैलेश बलकवडे यांची पुण्याला बदली | पुढारी

कोल्हापूर : महेंद्र पंडीत नवे जिल्हा पोलिस प्रमुख, शैलेश बलकवडे यांची पुण्याला बदली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून महेंद्र पंडीत यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक एकचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.

पंडीत मुंबई येथे आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते. भारतीय पोलिस सेवेचे २०१३ च्या बॅचचे अधिकारी असलेले पंडीत यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून गडचिरोली येथे तर पोलिस अधिक्षक म्हणून नंदूरबार येथे काम केले आहे.

हेही वाचा

Back to top button