पुढारी ऑनलाईन डेस्क : 'देवदास', 'पद्मावत', 'गंगुबाई काठियावाडी' यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या पहिल्या म्युझिक अल्बमची घोषणा केली आहे. भन्साळी यांचा पहिला म्युझिक अल्बम 'सुकून' ( Sukoon ) येत्या ७ डिसेंबर २०२२ रोजी स्ट्रीमिंग अॅप्स आणि सारेगामाच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात येणार आहे. यामुळे म्युझिक अल्बम 'सुकून'ची आतुरता चाहत्यांना लागली आहे.
संजय लीला भन्साळी यांचा 'सुकून' ( Sukoon ) हा म्युझिक अल्बम कोविड-१९ ची महामारी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर आधारित आहे. नुकतेच दिग्दर्शक तरूण आदर्श यांनी त्याच्या ट्विटवर माहिती देताना सांगितले की, संजय लीला भन्साळी यांचा पहिला 'सुकून' हा म्युझिक अल्बम ७ डिसेंबर २०२२ रोजी येणार आहे.
या अल्बम विषयीबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, 'कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण काळात विश्रांती घेत असताना मी खूपच शांतता आणि प्रेम अनुभवले. तबला, बासरी, गिटार, सारंगी, सतार, हार्मोनिअम यासह सर्व वाद्यांचे आवाज तुम्ही ऐकत आहात अशी ही गाणी ऐकताना तुम्हाला आनंद मिळेल अशी आशा आहे.'
संजय भन्साळीच्या या म्युझिक अल्बममध्ये एकूण ९ गाणी आहेत. या गाण्यांना राशिद खान, श्रेया घोषाल, अरमान मल्लिक, पापोन, प्रतिभा बघेल, शैल हादा आणि मधुबंती बागची यांनी उत्कृष्ट आवाज दिला आहे. यामुळे या पहिल्या म्युझिक अल्बमसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे.
हेही वाचलंत का?