RRR Sequel : आरआरआरच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर: सीक्वलची जोरदार तयारी

Critics Choice Awards
Critics Choice Awards

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक एस. एस. राजमौली याच्या 'आरआरआर' च्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर असून लवकरच निर्माते याच्या सीक्वल बनवण्याच्या तयारीला लागल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांनी मुख्य भूमिका साकराल्या आहेत. परंतु, येणाऱ्या सीक्वलमध्ये कोणकोणते कलाकर असणार यांची माहिती गुलदस्त्यात आहे. सध्या यावर काम सुरू आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या 'आरआरआर' नंतर त्याच्या सीक्वलच्या ( RRR Sequel ) प्रतिक्षेत चाहते लागले आहेत.

दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतील लवकरच सीक्वल ( RRR Sequel ) येणार असल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले की, 'पहिल्यांदा 'आरआरआर' चा सीक्वल बनवण्याचा कोणताच प्लान नसून आम्ही तसा विचारही केलेला नव्हता. परंतु, या चित्रपटाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्याचा सीक्वल बनवावा अशी कल्पना सुचली. वडील व लेखक विजयेंद्र प्रसाद 'आरआरआर'च्या सीक्वलवर काम करत आहेत. असेही त्यांनी सांगितले.

यापुढे 'आरआरआर'चित्रपटाचे जागतिक पातळीवर मिळालेलं यश पाहून माझ्या चुलत भावाने सीक्वल बनवण्याची कल्पना दिली आणि आमच्या टिमने त्यावर विचार केला. शेवटी 'आरआरआर'च्या सीक्वल बनवण्याच नक्की झालं. विजयेंद्र प्रसाद यांची स्क्रिप्ट लिहून पुर्ण झाली की, चित्रपटाचे नियोजन करू असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news