Shraddha Murder Case : “श्रद्धाचा आत्मा परत यावा आणि….” : राम गोपाल वर्मांचे ट्विट

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आहे. क्रौर्याची परिसीमा असणार्‍या ही घटना ( Shraddha Murder Case ) गुन्‍हा झाल्‍यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. या भंयकर गुन्‍ह्यावर सर्वच क्षेत्रातून तीव्र संताप व्‍यक्‍त होत आहे. या प्रकरणी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणबाबत ट्विटर अकाऊंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'मृत्यूनंतर विश्रांती घेण्याऐवजी श्रद्धाचा आत्मा परत यावा आणि बॉयफ्रेंडच्या शरीराचे ७० तुकडे करावेत'. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी 'कायद्याच्या चौकटीत राहून अशा क्रूर हत्या थांबविणे कदाचित शक्य नाही. अशा घटनेतील नराधमांना बळी पडलेल्यांचे आत्मे परत यावेत आणि त्यांनीच मारेकऱ्यांना संपवावे, तरच अशा हत्या कदाचित थांबतील. यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे.'

राम गोपाल वर्मा यांच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच घारेवर धरत ट्रोल केले आहे. यावेळी नेटकऱ्यांनी 'आत्मे कधी परत येवून माणसाची हत्या करतील का?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. या वादग्रस्त विधानांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्रद्धा वालकर खून प्रकरण बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ( Shraddha Murder Case )

काय आहे प्रकरण?

वसईमध्ये राहणारी श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांची कॉल सेंटरमध्‍ये काम करताना ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.  महिन्यानंतर श्रद्धाने तिच्या बॉयफ्रेंडची माहिती कुटूबियांना दिली. परंतु, कुटूबियांनी लग्नाला विरोध केला. घऱच्याचा विरोध पत्करत श्रद्धा आणि आफताब 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहायला लागले. काही महिन्यांनंतर दोघेजण दिल्लीला गेले आणि श्रद्धाने लग्नासाठी त्याच्या तगादा लावला. यावरून हळूहळू त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. यानंतर बॉयफ्रेंड आफताब पूनावालाने श्रद्धाचा गळा दाबून हत्या केली. यानंतर

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news