रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ प्रदर्शित

अदृश्य
अदृश्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : 'हत्या की आत्महत्या' याच रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित 'अदृश्य' हा नवा चित्रपट 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली.

'अदृश्य' हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते, पण सानिकाला ब-याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यू ही, 'हत्या की आत्महत्या' हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य 'व्यक्ती' की अदृश्य 'उत्तर' हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो.

अदृश्य
अदृश्य

मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि 'अदृश्य'च्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले.

सहकलाकार, उत्तम ठिकाण आणि उत्तम कथानक असलेला हा चित्रपट सुंदर झाला आहे, असे अभिनेत्री मंजरी फडणीसने सांगितले. तर अभिनेता पुष्कर जोगने 'मला खूप आनंद होतोय मराठी ओटीटी प्लॅाटफॅार्मवर माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आणि हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला झाला आहे,' असे सांगितले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news