पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन तिच्या आगामी 'द क्रू' ( The Crew ) चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात खास करून कृतीसोबत बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, करीना कपूर खान या एकत्रित दिसणार आहेत. एकता आर. कपूर आणि रिया कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याच दरम्यान चित्रपटात नव्याने बॉलिवूड अभिनेता दिलजीत सिंह दोसांझाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
चित्रपट निर्माती रिया कपूर यांनी एक मोठी घोषणा करत आगामी 'द क्रू' ( The Crew ) चित्रपटाचा अभिनेता दिलजीत दोसांझ भाग असणार असल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितली की, अभिनेता दिलजीत लवकरच चित्रपटात एन्ट्री होणार असून ते यासाठी खूपच उत्साहित आहेत. निर्मात्यांनीही दिलजीतचे स्वागत केलं आहे. हा चित्रपट नेहमीच खास आहे कारण, याआधी तुम्ही असा मनोरंजक चित्रपट पाहिला नसेल. उत्तम आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत.
कृती सेनॉनचा 'द क्रू' हा चित्रपट विमान कंपनीच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात तीन महिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नात असतात. परंतु, त्याच्यावर अन्यायकारक परिस्थिती निर्माण होते आणि त्या जाळ्यात अडकतात. असे दाखवण्यात आलं आहे. 'द क्रू' हा चित्रपट अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित आणि बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड आणि अनिल कपूर प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.
हेही वाचा :