ORSचे जनक डॉ. दिलिप महालनबीस यांचे निधन; लाखो मुलांचे ‘देव’ ठरलेले महान भारतीय – Dilip Mahalanabis Father of ORS no more

ORSचे जनक डॉ. दिलिप महालनबीस यांचे निधन; लाखो मुलांचे ‘देव’ ठरलेले महान भारतीय – Dilip Mahalanabis Father of ORS no more
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – लहान मुलांना जुलाब लागले तर त्यांना आपण ORS देतो. शरीरात कमी झालेले पाणी भरून काढणारे ORS लहान मुलांसाठी संजीवनी सारखे काम करते. जगभरात आज ORS अत्यंत नावजलेली, कमी खर्चाची अशी उपचार पद्धती मानली जाते. या ORSचे जनक असलेले भारताचे सुपुत्र डॉ. दिलिप महालनबीस यांचे रविवारी कोलकत्यातील एका खासगी रुग्णालया वार्धक्याने निधन झाले. बालरोगतज्ज्ञ आणि संशोधक म्हणून महालबनीस यांनी केलेल्या मुलगामी संशोधनामुळे जगभरातील लाखो मुलांचे प्राण वाचू शकले. (Dilip Mahalanabis Father of ORS)

डॉ. दिलिप महालनबीस यांचा जन्म २ नोव्हेंबर १९३४ला झाला. १९५८ला वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बालरोग तज्ज्ञ म्हणून काम सुरू केले. २ वर्षांनंतर ते लंडनमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये रुजू झाले. त्यानंतर हे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीत रुजू झाले. १९६४ ला भारतात परत आल्यानंतर त्यांनी जुलाब लागलेल्या मुलांना तोंडावाटे असे काही औषध देता येईल का जेणे करून शरीरातील झालेली पाण्याची कमरता भरून काढता येईल, यावर संशोधन सुरू केले. या उपचार पद्धतीला Oral Rehydration Therapy (ORT) असे नाव आहे. मीठ, ग्लुकोज, खायचा सोडा असे घटक वापरून औषध बनवता येईल का, यावर ते संशोधन करत होते.

१९७१ला बंगला देश मुक्तियुद्ध सुरू झाले. या काळात बंगला देशातील लाखो निर्वासित पश्चिम बंगलामध्ये आश्रयाला आले होते. या निर्वासितांसाठींच्या छावण्यांत कॉलराची साथ सुरू झाली. ज्या मुलांना कॉलराची लागण झाली, अशांना डॉ. दिलिप महालनबीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ORT देले. त्यामुळे मुलांचा मृत्युदर ही कमी झाला आणि साथही आटोक्यात आली.

Johns Hopkins Medical Journal आणि Lancet या दोन नियतकालिकांमध्ये ORTवरील संशोधन प्रसिद्ध झाले. त्यानंतर ही उपचार पद्धती ORS या नावाने प्रसिद्ध झाली. पुढे जागतिक आरोग्य संघटनेच्या Diarrheal Disease Control Programmeची जाबदारी डॉ. दिलिप महालनबीस यांच्याकडे देण्यात आली. ORS ही उपचार पद्धती जगभरात मान्यताप्राप्त झाली. जुलाबमुळे विशेष करून गरीब देशांत लाखो मुलांचा बळी जायचा, तो या उपचार पद्धतीमुळे नियंत्रणात आला. डॉ. दिलिप महालनबीस यांच्या या कार्याचा उल्लेख जगभरात अंत्यत आदराने केला जातो.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news