Gold Overdraft Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन म्‍हणजे काय? जाणून घ्‍या सविस्‍तर

Gold Overdraft Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन म्‍हणजे काय? जाणून घ्‍या सविस्‍तर
Published on
Updated on

ओव्हरड्राफ्ट लोनमध्ये आपल्याला सोन्याच्या किमतीएवढेच पैसे मिळतात. यासाठी बँक किंवा कंपनीकडे सोने तारण ठेवावे लागते. मात्र सामान्य गोल्ड लोनपेक्षा ओव्हरड्राफ्ट लोनवरील व्याजदर जादा असतो. कोणत्याही व्यक्तीला आजकाल पैशाची गरज केव्हाही लागू शकते. म्हणूनच त्वरित पैसे उपलब्ध करण्यासाठी सोनेतारण हा पर्याय बरेचजण निवडतात. त्यातून गरजेनुसार आपण पैसे काढू शकता. मात्र सामान्य गोल्ड लोनपेक्षा ओव्हरड्राफ्ट लोनवरील ( Gold Overdraft Loan )व्याजदर जादा असतो. या सुविधेबाबतची सविस्‍तर माहिती जाणून घेऊ.

गोल्ड लोन आणि गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन हे दोन्ही कर्जाचे प्रकार सिक्यूर्ड लोनच्या श्रेणीत मोडतात. सोने तारण कर्जाच्या सुविधेनुसार कर्जदार हे आपल्याकडील सोने, दागिने बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून कर्ज घेतो. अशा प्रकारचे कर्ज नागरिक आणीबाणीच्या काळात घेतात. विशेषत: आरोग्य खर्चावेळी किंवा घर खरेदीच्या वेळी रक्कम कमी पडत असेल आणि गृहकर्ज कमी मिळत असेल तर नागरिक सोने तारण घेऊन कर्ज घेतात. सोने तारण कर्जाचा कालावधी हा कमी असतो आणि त्यावर व्याजदर हे सामान्य व्याजदराच्या तुलनेने अधिक असते. सोने तारण कर्ज पूर्णपणे फेडल्यानंतर बँक आपले सोने परत करते. साधारणपणे फिजिकल गोल्ड हे 18 कॅरेट ते 22 कॅरेटचे सोने गहाण ठेवून दिले जाते.

Gold Overdraft Loan

सोन्यावरील घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर ओव्हरड्राफ्ट लोनची सुविधा उपलब्ध असते. गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन हे क्रेडिट कार्डवर होणार्‍या खर्चाप्रमाणे काम करते. यानुसार एका निश्चित मर्यादेपर्यंत आपण खर्च करू शकता. गोल्ड लोनचा व्याजदर केवळ वापरलेल्या पैशावर आकारला जातो. आपण बँकेकडे सोने तारण ठेवतो, तेव्हा बँकेकडून ओव्हरड्राफ्ट अकाऊंट सुरू केले जाते. यात गहाण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीनुसार कर्जाची रक्कम जमा केली जाते.

फायदे काय आहेत?

काही बँकांकडून कोणत्याही एटीएममधून डेबिट कार्डचा वापर करत गोल्ड लोनची अकाऊंट काढण्याची परवानगी दिली जाते, तर काही बँका बचत खात्याला ओव्हरड्राफ्ट लोन लिंक करतात किंवा नव्याने ओव्हरड्राफ्ट अकाऊंट सुरू करतात. कर्जाऊ रकमेचा वापर करण्यासाठी या अकाऊंटवर मिळालेल्या चेकबुकचाही वापर करता येऊ शकतो. गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट लोनमधील मुख्य फरक म्हणजे इथे कर्जदाराला ईएमआय भरावा लागत नाही. एकरकमी रक्कम भरून सोने सोडवून घेता येते. अर्थात यासाठी व्याजदर सामान्य कर्जापेक्षा खूप जास्त असतात. परंतु गोल्ड लोनमध्ये एखादा हप्ता थकल्यानंतर त्यावरील दंड किंवा नंतरच्या दिवसांसाठी वाढीव दराने व्याजआकारणी केली जाते. त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्याऐवजी गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन तुलनेने किफायतशीर ठरतो.

तोटे कोणते आहेत?

गोल्ड लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा जोखमीची समजली जाते कारण सोने हे एक कमोडिटी असून ते बाजारात होणार्‍या चढउतारावर अवलंबून असते. अशा वेळी बाजारात सोन्याचा भाव उतरल्यास आपले नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर वेळेवर गोल्ड लोन ओव्हरड्राफ्टची रक्कम न भरल्यास बँक आपले सोने गोठवू शकते.

सुचिता महाजन

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news