Diabetes care | पावसाळ्यात मधुमेह रूग्णांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या अधिक

Diabetes care | पावसाळ्यात मधुमेह रूग्णांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या अधिक

पुढारी ऑनलाईन : चहाचा कप, सोबत गरमागरम भजी आणि खिडकीबाहेर नजर टाकून मस्त गाणी ऐकत बसणे आणि मनावर जादू करणारा पावसाळा यांचे अगदी पक्के समीकरण बनून गेले आहे. मात्र या दिवसात आजारी मधुमेह असणाऱ्यांनी इतरांच्या तुलनेत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया पावासाळ्यात मधुमेह रूग्णांनी (Diabetes care) आपली काळजी कशी घ्यावी.

पावसाळ्यात मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही परिस्थिती नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी SMBG/कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) या साधनांचा वापर करून हे सहज शक्य आहे. यामध्ये ज्यात एखाद्या व्यक्तीची ग्लुकोज पातळी कशी राहते हे सहज मोजता येते. ही आकडेवारी वरचेवर तपासत ग्लुकोजवर नियंत्रण राखणे सहज (Diabetes care) शक्य होते.

मुंबई येथील डॉ. अल्पना सोवानीज डायबेटीस केअर क्लिनिकच्या मधुमेहतज्ज्ञ डॉ. अल्पना सोवानी सांगतात, "मधुमेहासह असणाऱ्या व्यक्तींसाठी पावसाळा हा फ्लू तसेच विविध जल आजारांच्या संसर्गाचे संकेत घेऊन येतो. बदलेल्या वातावरणाचा अशा व्यक्तींच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी आव्हानात्मक (Diabetes care) बनून जातो.

या काळात मधुमेह व्यक्तींनी आरोग्याच्या समस्या व ग्लुकोजच्या पातळीमधील चढउतार टाळत, निरोगी राहण्यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. तसेच प्रतिबंधात्मक पावले देखील उचलायला हवीत. म्हणूनच पावसाळ्यामध्ये सततची देखरेख अत्यंत महत्त्वाची ठरते. यासाठी कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) सारख्या उपाय योजनांचा अवलंब करता येईल, असेही डॉ. सोवानी यांनी म्हटले आहे.

Diabetes care: या सूचना पाळा अन् मधुमेहासह पावसाचा आनंदही लुटा

1. रक्तातील साखरेच्या पातळीवर नियमितपणे देखरेख ठेवा

या ऋतूमध्ये तुमच्या व्यायामाच्या नियमित वेळापत्रकामध्ये आणि आहारामध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे ग्लुकोजची पातळी वारंवार तपासणे अत्यावश्यक ठरते. सुदैवाने हे करण्याचे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत. FreeStyle Libre सारखे वेअरेबल CGM उपकरण तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमच्या ग्लुकोजच्या पातळीची आकडेवारी सांगू शकते. मधुमेह रूग्णांनी प्रत्येक दिवसाच्या २४ तासांत किमान १७ तास तरी ग्लुकोजची इष्टतम पातळी (सर्वसाधारणपणे ७०-१८० mg/dl) राखण्याचा प्रयत्न करायला हवा. मग ऊन असो वा पाऊस, तुम्हाला तुमच्या मधुमेहाचे सर्वकाळ व्यवस्थापन करता येईल.

2. आहारात रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश करा

मधुमेहामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती दुर्बल होते. म्हणूनच रस्ताकडेच्या गाड्यांवरचे चटकदार पदार्थ खाण्याचा मोह खाणे टाळायला हवे. घरच्या घरी बनविलेल्या, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तसेच पोषक घटकांनी समृद्ध आणि अँटिऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करणे उत्तम. कच्चे पदार्थ खाणे मात्र टाळा कारण यामुळे या काळात रोगसंसर्गाचा धोका जास्त असतो. त्याबरोबरच पालेभाज्या शिजवण्यापूर्वी न विसरता स्वच्छ धुवून घ्या, कारण त्यात कीड किंवा बॅक्टेरिया असू शकतात.

3.आपले पाय कोरडे ठेवा

मधुमेहग्रस्त व्यक्तींनी या ऋतूमध्ये आपल्या पायांची अधिकच काळजी घ्यायला हवी. पावसामध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा रोगजंतूंच्या संसर्गात आल्यानंतर पाय स्वच्छ धुणे गरजेचे आहे. घराबाहेर जाताना मोज्यांचे अधिकचे जोड सोबत ठेवणे गरजेचे आहे. भिजलेले मोजे जास्तवेळ वापरणे टाळावे. बुरशीजन्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सोयीस्कर बूट घाला आणि ते नेहमी कोरडे व स्वच्छ ठेवा. (साचलेल्या पाण्याच्या डबक्यांतून चालू नका)

4. व्यायाम टाळू नका

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला घरात बसून आराम करण्याची इच्छा होते. पण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सक्रिय रहायला हवे आणि व्यायामाचे वेळापत्रक नियमितपणे पाळायला हवे. पावसामुळे घराबाहेरच्या व्यायामाचे काही पर्याय कदाचित उपलब्ध होणार नाहीत, पण तुम्ही घरच्या घरी काही कमी श्रम लागणारे व्यायाम करू शकता. अर्ध्या तासाचा व्यायाम किंवा रोज घरातल्या घरात चालणे यामुळेही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.

5.भरपूर पाणी प्या

पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते, त्यामुळे तुमच्या शरीराला आपोआपच आर्द्रता मिळते, असा त्याचा अर्थ होत नाही. हवेतील दमटपणा आणि उष्मा हे भारतीय मान्सूनचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील आर्द्रतेची पातळी कमी होऊ शकते. म्हणून मधुमेह असलेल्या व्यक्तींनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवे.

6. डोळ्यांना जपा

हवेतील आर्द्रतेमुळे डोळ्यांना चटकन जंतूसंसर्ग होऊ शकतो. म्हणूनच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या डोळ्यांना हात लावताना काळजी घ्यायला हवी. आपले हात स्वच्छ धुवून नंतरच डोळ्यांना स्पर्श करायला हवा. पावसात भिजणार असाल तर डोळ्यांवर शक्यतो संरक्षक चष्मा चढवा. डायबेटिक रेटिनोपॅथीची शक्यता टाळण्यासाठी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.
याखेरीज मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हायपरग्लायसेमिया आणि हायपोग्लायसेमियाच्या चिंताजनक स्थितीविषयी सतत दक्ष असले पाहिजे. अशी काही लक्षणे वाटल्यास त्यांची तत्काळ काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच मान्सूनच्या काळात मधुमेह असलेल्या कोणत्याही व्यक्तीने 'सावध रहा' हा मंत्र सतत ध्यानात ठेवला पाहिजे, असेही मुंबई येथील डॉ. अल्पना सोवानीज यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news