धुळे जिल्हा बँक : सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

धुळे जिल्‍हा बँक
धुळे जिल्‍हा बँक

धुळे जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवले आहे. तर संघर्ष पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे यांचे बंधु सुरेश पाटील हे पराभुत झालेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या पक्षांचे ९ सदस्य निवडूण आले आहेत. बँकेच्या अध्यक्षपदाची माळ महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. (धुळे जिल्हा बँक)

धुळे व नंदुरबार जिल्हा बॅकेच्या १७ जागांसाठी निवडणुक प्रक्रीया राबवण्यात आली. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल, कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे यांच्यासह सर्वपक्षिय नेत्यांनी बैठकांचे सत्र सुरु केले. यात सात जागा बिनविरोध झाल्या. पण या बैठकांना शिवसेनेने दांडी मारल्याने तसेच नंदूरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाच्या नेत्यांना सहकार्य करण्याची भुमिका घेणार नसल्याचे जाहीर केले.

तर राष्ट्रवादीचे जिल्हा परीषद सदस्य पोपटराव सोनवणे यांनीही निवडणुक बिनविरोध करण्याच्या प्रक्रीयेस विरोध केल्याने नऊ मतदार संघातील दहा जागांसाठी मतदान घेण्यात आले.

दरम्यान आज झालेल्या मतमोजणीत सर्वपक्षिय शेतकरी पॅनलचे उमेदवार माजी आमदार तथा बँकेचे मावळते चेअरमन राजवर्धन कदम-बांडे, माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या पत्नी शिलाताई पाटील, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सिमाताई रंधे, तसेच राजेंद्र देसले, हर्षवर्धन दहीते, दर्यावगीर महंत, अमरसिंग गावीत हे विजयी झाले. (धुळे जिल्हा बँक)

विरोधी असलेल्या संघर्ष पॅनलचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद पाटील, संदीप वळवी हे विजयी झाले.
यापुर्वी सर्वपक्षिय शेतकरी पॅनलचे शिरीष नाईक, दिपक पाटील, भरत माळी, प्रभाकरराव चव्हाण, शामकांत सनेर, भगवान पाटील हे तर संघर्ष पॅनलचे आमशा पाडवी हे बिनविरोध झाले होते.

या निवडणुकीत खा. डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश पाटील यांचा प्रा. शरद पाटील यांनी पराभव केला. बॅकेवर सर्वपक्षिय शेतकरी पॅनलचे 13 सदस्य निवडून आल्याने, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर अध्यक्षपदाला कोणाला संधी मिळणार हे पहावे लागणार आहे.
राज्यातील भाजपा विरुध्द महाविकास आघाडी हा वाद पहाता, या बँकेच्या राजकारणावर परीणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

पक्षिय बलाबल पाहता बँकेच्या अध्यक्षपदाची संधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राजवर्धन कदम-बांडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news