गुरु हा गुरुच असतो..! धोनीचा एक इशारा आणि हार्दिक जाळ्यात ‘फसला’ (video viral)

गुरु हा गुरुच असतो..! धोनीचा एक इशारा आणि हार्दिक जाळ्यात ‘फसला’ (video viral)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्वॉलिफायर-1 सामन्‍यात मंगळवारी ( दि. २३) गुजरात पराभव करत चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाने दिमाखात फायनलमध्‍ये ( CSK in IPL 2023 Final )धडक मारली . CSK vs GT ही लढत गुरु विरुद्‍ध शिष्‍य अशी होती. कारण गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) आपला गुरु मानतो. यंदाच्‍या मोसमातील पहिल्‍याच सामन्‍यात शिष्‍याने बाजी मारली होती. मात्र क्वॉलिफायर-1चा सामन्‍यात गुरुने आपली खास रणनीती वापरत हार्दिकला जाळ्यात अडकवले. हार्दिकच्‍या विकेटचा व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे. (Dhoni's strategy video viral)

गुरु आणि शिष्‍य आमने-सामने

सलग दोन वर्ष आयपीएलमधील गुजरात संघाची कामगिरीने सर्वच संघांना धडकी भरवणारी ठरली आहे. संघाना नव्‍या उंचीवर घेवून जाणार्‍या हार्दिकच्‍या कामगिरीचीही बरीच चर्चा होती. आयपीएल फायनलमध्‍ये धडक मारण्‍यासाठी गुरु आणि शिष्‍य आमने-सामने आले होते. क्वॉलिफायर-1चा सामन्‍यात हार्दिक बाजी मारणार की धोनीची रणनीती यशस्‍वी ठरणार याकडे क्रिकेट चाहत्‍यांचे लक्ष लागले होते.

Dhoni's strategy video viral : धोनीची रणनीती आणि हार्दिक फसला…

चेन्‍नई सुपर किंग्‍जने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्‍ये सात गडी गमावत १७२ धावा केल्या होत्या. गुजरातचीही सुरुवात चांगली झाली होती. गुजरात १७२ धावांचे लक्ष्‍य सहज साध्‍य करेल, असे मानले जात होते. मात्र धोनीने हार्दिकसाठी खास रणनीती आखली होती. त्‍याने फिरकीपटू महेश तिक्षानाकडे चेंडू सोपवला. त्‍याचबराेबर त्‍याने एक इशारा देत क्षेत्ररक्षणातही बदल केला. हार्दिकच्‍या कमकुवत बाजूंचा अचूक अंदाज असल्‍याने धाेनीने ऑफ साइडला  क्षेत्ररक्षण वाढवले. वेगवान धावा करण्‍याच्‍या नादात असलेला हार्दिक तिक्षानाने टाकलेला आखडू चेंडू फटकविण्‍याचा माेह आवरता आला नाही आणि  जडेजाने पॉइंटवर हार्दिकचा सोपा झेल घेतला. क्रिकेट जगतामध्‍ये धोनीला बेस्‍ट रणनीतीकार का मानले जाते, याचा हा पुरावाच होता. हार्दिकची विकेट गुजरात संघासाठी मोठा धक्‍का हाेता. यानंतर हा संघ पुन्‍हा सामन्‍यात पकड निर्माण करु शकला नाही.

चेन्‍नई सुपर किंग्‍जने २० षटकांमध्‍ये ७ विकेट गमावत १७२ धावा केल्या होत्‍या. त्यानंतर गुजरात संघ २० षटकांमध्‍ये केवळ १५७ धावा करू शकला. ६० धावा आणि शानदार क्षेत्ररक्षणासाठी ऋतुराज गायकवाडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता २८ मे रोजी IPL चा अंतिम सामना खेळण्‍यासाठी चेन्‍नई संघ सज्‍ज झाला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news