काँग्रेस घेतेय विकास ठाकरे यांचा राजकीय बळी : धर्मपाल मेश्राम

धर्मपाल मेश्राम
धर्मपाल मेश्राम

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा निवडणुकीत एकीकडे भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली असून ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमधून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना नागपूरातुन उमेदवारी म्हणजे, त्यांचा राजकीय बळीच प्रकार असल्याचा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

संबंधित बातम्या 

नितीन गडकरी यांनी नागपूरात मेट्रो, मिहान, एम्स असे सर्वांगीण क्षेत्रात एवढे काम केले आहे की, ज्यामुळे एकतर त्यांच्या विरोधात लढायला कुणी तयार नाहीत, आता नेत्यांनी आपल्या सोयीसाठी विकास ठाकरे यांना उभे केले तरी नक्की त्यांचा मोठा पराभव होणार आहे. शहरातील सहाही मतदारसंघात भाजपला मोठी लीड मिळेल आणि त्याचा प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पण पडणार असल्याचा दावा मेश्राम यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news