Zilla Parishad CEO Transfer News | आता जळगाव जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ शुभम गुप्ता

Zilla Parishad CEO Transfer News | आता जळगाव जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ शुभम गुप्ता
Published on
Updated on

जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क
राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (ZP CEO Shri. Shubham Gupta has been posted as Chief Executive Officer, Z.P., Jalgaon.) निवडणूक आयोगाने नुकतेच देशभरातील विविध राज्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्यांचा किंवा गृह कॅडर असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोठे झाली कुणाची नियुक्ती?
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी श्री. अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त केली आहे. सध्या इथे मनोजकुमार सूर्यवंशी कार्यरत आहेत. तर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या इथे शुभम गुप्ता हे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news