बीड : राज्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हेच पाचव्या ज्योतिर्लिंगाचे स्थान : धनंजय मुंडे

बीड :  राज्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हेच पाचव्या ज्योतिर्लिंगाचे स्थान  : धनंजय मुंडे

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील परळीत असलेले वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हेच पाचवे ज्योतिर्लिंग असून दुसरे कोणते नाही असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित शिवमहापुराण कथा कार्यक्रमात केले.

देशात बारा ज्योतिर्लिंग असून यातील पाचवे ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ येथे आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे. मात्र, महाराष्ट्रातील वैद्यनाथ मंदिर आणि झारखंड येथील देवघर या स्थानांत काही जण ज्योतिर्लिंग स्थानाचा वाद व संभ्रम निर्माण करतात. शासकीय पातळीवर विकास निधी व तीर्थक्षेत्र विकास योजना राबवताना भेदभाव होतो.

काही दिवसापूर्वीच झारखंड येथे ज्योतिर्लिंग स्थान म्हणून मोठा विकास निधी देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान नेमकं कोणतं? हा विषय चर्चेला आला आहे. याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध कथाकार प. पु. प्रदीप मिश्रा यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे ठणकावून सांगितले.

परळी शहरात १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेचे आयोजन केले गेले आहे. आमदार धनंजय मुंडे या कथेचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनी महाराजांचे स्वागत करत आपले मनोगत व्यक्त केले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news