जालना घटनेला न्याय मिळेल; देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना चर्चेसाठी बोलावले

जालना घटनेला न्याय मिळेल; देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना चर्चेसाठी बोलावले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. जालना घटनेला न्याय मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जरंगे पाटील यांना दिली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक नेत्यांसोबत लवकरच बैठक होईल, अशी सरकारला आशा आहे.

आज (दि.४) मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेची विनंती केली होती.

आता मुंबईत येण्याची गरज नाही : मनोज जरांगे पाटील

"सरकारने आम्हाला चर्चेसाठी मुंबईला बोलावले होते, पण आता मुंबईत येण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही कारण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील सरकारी शिष्टमंडळाने आम्हाला भेटून आमच्याशी चर्चा केली. आम्हाला जे काही बोलायचे होते ते आम्ही सांगितले. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले आहे की, सरकारला मराठा आरक्षण दोन दिवसात जाहीर करावे लागेल आणि त्याची अंमलबजावणीही करावी लागेल. महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी बैठक घेणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आज या प्रश्नावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे," असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी एएनआयला सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news