श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माध्यमातून प्रेमभावना वाढवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माध्यमातून प्रेमभावना वाढवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on
नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : 'हाथी-घोडा-पालखी… जय कन्हैयालाल की…' या जयघोषात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी एकोप्याने राहत दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला वाटून समाजात प्रेमभावना वाढविण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अनेक ठिकाणी भेट दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी अवस्थी नगर, कमाल चौक, कोतवाली तसेच शारदा चौक येथील दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली. यावेळी त्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी श्रीफळाने फोडून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करण्याचे तसेच गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचतांना सुरक्षेची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही केले. आमदार प्रवीण दटके व संबंधित मंडळाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
 
.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news