Jahangirpuri Violence : दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत हिंसाचार

Jahangirpuri Violence : दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत हिंसाचार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी दिल्लीच्या जहांगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरणुकीत हिंसेचा भडका उडाल्यानंतर राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. युपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, "वरिष्ठ पोलिसांना आपापल्या क्षेत्रांतील संवेदनशील परिसरात काळजीपूर्वक नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये एक दिवस अगोदरच हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हिंसेचा भडका उडाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणाच दगडफेक करण्यात आली, तसेच काही जणांकडून तलवारीदेखील नाचवत दहशत माजविण्यात आली. मिरणुकीतील शोभा यात्रेत दगडफेक झाल्यानंतर ही हिंसात्मक घटना जास्त चिघळली.

समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये दोन समुदायामध्ये मोठी दंगल झाली. हनुमान जन्मोत्सन दरम्यान काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या हिंसाचारात जखमी झालेल्यांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात हलविण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

दिल्ली पोलीस पीआरओ डीसीपी अन्वेयस राय म्हणाले की, "जहांगीरपुरीमध्ये शोभा यात्रेदरम्यान हिंसा झालेली आहे." या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दगडफेक आणि आगीच्या घटनेमध्ये हेल्मेट घातलेले पोलीस कर्मचारी हिंसात्मक घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. या हिंसेमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झालेले व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधून दिसून येत आहे.

पहा व्हिडिओ : दोन वर्षांनी पुन्हा एकदा दख्खनचा राजा न्हाऊन निघाला गुलालात | Shree Jotiba yatra

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news