पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विद्यापीठाच्या आर्यभट्ट कॉलेजबाहेर रविवारी (दि.१८) एका १९ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. निखिल चौहान असे या हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विद्यापीठाच्या ओपन लर्निंग स्कूलमध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या वर्गात जाण्यासाठी तो कॉलेजमध्ये आला होता.
निखिलला दुसऱ्या एका विद्यार्थ्याने भोसकले ज्याच्याशी सात दिवसांपूर्वी वाद झाला होता. विद्यार्थ्याने निखिलच्या मैत्रिणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. रविवारी आरोपी विद्यार्थी त्याच्या तीन साथीदारांसह आला आणि कॉलेजच्या गेटबाहेर निखिलला धक्काबुक्की केली. त्यानंतर निखिलला मोतीबाग येथील चरक पालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.