Delhi Flood News: पूरसदृश्य परिस्थितीनंतर, दिल्ली हळूहळू पूर्वपदावर

यमुनेच्या जलस्तरात वाढ झाल्याने दिल्लीतील अनेक भागात अजूनही पाणी भरले आहे.
यमुनेच्या जलस्तरात वाढ झाल्याने दिल्लीतील अनेक भागात अजूनही पाणी भरले आहे.

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीत झालेल्या विक्रमी पावसानंतर पुरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीजवळ असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने पूराची आपात्ती स्थिती उद्भवली होती. मात्र हळूहळू राज्यातील पूर्वपदावर येत आहे. दरम्यान यमुना नदीची पाणी पातळी घटल्याने सखल भागात साचलेले पाणी देखील ओसरले आहे. हरियाणाच्या हथिनी कुंड बॅराजमधून पाणी सोडण्यात आल्याने यमुना नदीतील (Delhi Flood News) पाण्याची पातळी वाढली आहे.

यमुना नदीच्या पातळीने गत ४५ वर्षांचा विक्रम तोडल्यानंतर शनिवारी सकाळी ती २०७.६८ मीटर पर्यंत खालावली आहे. ही पातळी आणखी खालावली तर स्थिती लवकरच सामान्य (Delhi Flood News) होईल.

राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करीत दिल्लील स्थितीची माहिती दिली. यमुना नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे. मुसळधार पाऊस झाला नाही, तर लवकरच स्थिती सामान्य होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. चंद्रावल आणि वझिराबाद जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी बाहेर काढणे सुरू आहे. या प्रक्रियेनंतर रविवार पर्यंत केंद्र सुरू केले जातील. सतर्क राहूत एकमेकांना मदत करण्याचे आवाहन यानिमित्ताने केजरीवाल (Delhi Flood News) यांनी केले.

दिल्लीतील सध्याची पूरस्थिती पाहता, मुख्य सचिव नरेश कुमार यांनी बचाव, मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी एलएएस आणि डॅनिक्स अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. ऑर्डर सर्व 11 जिल्हे आणि 33 उपविभागांसाठी आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news