Delhi Fire
Delhi Fire

Delhi Fire: दिल्लीतील नरेला भागातील कारखान्याला भीषण आग; अग्निशमनच्या 20 गाड्या घटनास्थळी

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील नरेला भागातील 'डीएसआयडीसी'औद्योगिक क्षेत्रातील कारख्यानाला आज (दि.२४) दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उपमुख्य अग्निशमन अधिकारी एसके दुआ यांच्यासह 100 हून अधिक अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान, आग विझवण्याचे शर्ततीचे प्रयत्न सुरू आहेत, असे वृत्त 'ANI' या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Delhi Fire)

दिल्लीतील नरेला भागातील कारखान्याला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम जोरात सुरू असून, आग विझवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, असे देखील घटनास्थळावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले गेले आहे. (Delhi Fire)

मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम जोरात सुरू आहे. अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी या प्रकरणाला दुजोरा देताना सांगितले की, आज(दि.२४) दुपारी १२ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा: 

logo
Pudhari News
pudhari.news