पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवेळा समन्स बजावले. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी 'ईडी'ने दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात तक्रार दिली आहे. यावर आज (दि.७) न्यायालय निर्णय देणार आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात 'ईडी'ने मुख्यमंत्री केजरीवाल यांना गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि यावर्षी 3 जानेवारी, 18 जानेवारी आणि 31 जानेवारी रोजी समन्स पाठवले होते. केजरीवाल यांनी पाचहड समन्सला प्रतिसाद दिला नाही. तसेच ईडीने बजावलेले समन्स बेकायदेशीर आहेत. भाजप हे सर्व राजकीय द्वेषातून करत आहे, असा दावा त्यांनी केला होता.
केजरीवाल यांनी समन्सला उत्तर न दिल्याने 'ईडी'ने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांच्यासमोर तक्रार दाखल केली होती. न्यायालय आज यावर निकाल देऊ शकते.
हेही वाचा :