पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : Women's Commission : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप झालेल्या साजिद खानची दूरचित्रवाहिनीवरील 'बिग बॉस' कार्यक्रमातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.