दिल्लीला जाणार्‍या इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक, भुवनेश्वरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीला जाणार्‍या इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक, भुवनेश्वरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे टेकऑफनंतर काही वेळातच पक्ष्याला धडक दिली.
त्‍यामुळे भुवनेश्वर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी (आपत्कालीन) लँडिंग करण्यात आल्‍याचे वृत्त आहे.

इंडिगो विमानाचे सोमवारी भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर (BPIA) एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 180 प्रवाशांसह विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी विमानाने भुवनेश्वर विमानतळावरून नवी दिल्लीसाठी नियोजित वेळेत उड्डाण केले. 20-25 मिनिटांनंतर, सकाळी ८ वाजून १५ मिनिटाला सुमारास वैमानिकाला तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाली. इंजिनच्या डाव्या बाजूला तांत्रिक बिघाडामुळे परतावे लागले, असे सूत्रांनी सांगितले. प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले आहे. इंडिगो फ्लाइट 6E-2065 च्या सर्व प्रवाशांसाठी दुसर्‍या फ्लाइटची व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news