Chandrayaan-3 Mission | विक्रम लँडरने चांद्रयान-३ चे मुख्य उद्दिष्ट केले पूर्ण; ISRO ने शेअर केला व्हिडिओ | पुढारी

Chandrayaan-3 Mission | विक्रम लँडरने चांद्रयान-३ चे मुख्य उद्दिष्ट केले पूर्ण; ISRO ने शेअर केला व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्रम लँडरने चांद्रयान-३ मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. सोमवारी इस्रोने विक्रम लँडरने आपला ‘हॉप प्रयोग’ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर स्वत:ला सुमारे ४० सेमी उंचीवर नेले आणि पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग केले, याची माहिती इस्रोने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट प्रसिद्ध (Chandrayaan-3 Mission) करत दिली आहे.

चांद्रयान-३ चे मुख्य उद्दिष्ट असलेले ‘किकस्टार्ट’  हे भविष्यात उपयुक्त ठरेल. हे उद्दिष्ट चंद्रावरील हा नमुना परतावा मिळवण्यासाठी आणि मानवी मोहिमांना प्रोत्साहन देईल, असेही इस्रोने (Chandrayaan-3 Mission) म्हटले आहे.

चंद्रावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर काही दिवसांनी विक्रम लँडरने पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट-लँडिंग’ केले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने म्हटले आहे की, ‘विक्रम लँडरने चांद्रयान-3 मोहिमेचे उद्दिष्ट ओलांडले आहे आणि ‘हॉप प्रयोग’ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तेसच कमांड देताच लँडरने इंजिन सुरू केले. तसेच अपेक्षेप्रमाणे स्वतःला सुमारे ४० सेमी उंचीवर नेले आणि पुन्हा ३० ते ४० सेमी अंतरावर सुरक्षितपणे उतरवले असल्याचेही इस्रोने स्पष्ट (Chandrayaan-3 Mission) केले आहे.

Chandrayaan-3 Mission: चंद्रावर लँडरचे पुन्हा सॉफ्ट लँडिंग

रोव्हर स्लीप मोडमध्ये गेल्यानंतर, कंट्रोल रूमच्या आदेशानुसार विक्रम लँडरचे इंजिन रीस्टार्ट करण्यात आले. सुचनेनुसार ते ४० सेमीवर उचलले गेले. त्यानंतर त्याच्या स्थितीपासून ३० – ४० सेमी अंतरावर पुन्हा विक्रम लँडरने सुरक्षितपणे सॉफ्ट लँडिंग केले.

 काय आहे इस्रोचा ‘हॉप प्रयोग’

इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेतील यशस्वी ‘हॉप प्रयोगा’मुळे भविष्यात चंद्रावरून नमुना परत आणण्याचे आणि मानवयुक्त मोहीम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. दरम्यान चांद्रयान-३ यानाच्या सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे इस्रोने म्हटले आहे. या ‘हॉप प्रयोगा’द्वारे, रॅम्प, ChaSTE आणि ILSA परत दुमडले गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पुन्हा यशस्वीरित्या तैनात केले गेल्याचे इस्रोने म्हटले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button