‘जयघोष भारत मातेचा’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीनमध्ये घेतली सैनिकांची भेट

‘जयघोष भारत मातेचा’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीनमध्ये घेतली सैनिकांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखमधील लेहमध्ये पोहोचले आहेत. तिथे त्यांनी सियाचीनमध्ये तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांची भेट घेतली आणि संवाद साधला. जवानांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान भारत माता की जयच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

सियाचीन बेस कॅम्पवर जवानांना संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तुम्ही ज्या प्रकारे देशाचे रक्षण करता, त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. सियाचीनची जमीन ही सामान्य जमीन नाही, ते एक प्रतीक आहे. हे देशाचे सार्वभौमत्व आणि एकता दर्शवते. आपली राष्ट्रीय राजधानी दिल्ली आहे, मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, आपली तांत्रिक राजधानी बेंगळुरू आहे, पण सियाचीन ही शौर्य आणि धैर्याची राजधानी आहे.

राजनाथ सिंह सियाचीनला सैनिकांसोबत होळी सण साजरा करणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी संरक्षण मंत्री लेहमध्येच जवानांसोबत होळी साजरी करून परतले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news