

कोलकाता ; पुढारी ऑनलाईन शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला कोलकाता हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग पॅनलने केलेली शालेय शिक्षक भरती हायकोर्टाने रद्द केली आहे. हायकोर्टाने 2016 चे संपूर्ण जॉब पॅनल रद्द केले असून सुमारे 24 हजार नोकऱ्या हायकोर्टाने रद्द केल्या आहेत. या भरतीत 5 ते 15 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
भरती घोटाळ्यात माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि तृणमूलचे अनेक पदाधिकारी तसेच राज्य शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी तुरुंगात गेले आहेत. कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर ईडी आणि सीबीआय हे दोन्ही कथित अनियमिततेचा तपास करत आहेत.
हा घोटाळा 2014 चा आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाने (एसएससी) पश्चिम बंगालमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली होती. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी पार्थ चॅटर्जी हे शिक्षणमंत्री होते. या प्रकरणातील अनियमिततेच्या अनेक तक्रारी कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.