Defence Minister Rajnath Singh: जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना समुद्रतळातूनही शोधून काढू; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Defence Minister Rajnath Sing
Defence Minister Rajnath Sing

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय नौदलाने समुद्रावर निगराणी वाढवली आहे. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ला ज्यांनी केला त्यांना आम्ही समुद्रतळातून शोधून काढू आणि त्यांच्यावर कडक कारवाई करू, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्‍पष्‍ट केले. आज (दि.२६) मुंबईत आयएनएस इंफाळच्या नौदलात दाखल कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते. (Defence Minister Rajnath Singh)

हिंद महासागरात चीनच्या वाढत्या घुसखोरी दरम्यान भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेला चालना देण्यासाठी आज (दि.२६) भारतीय नौदलात INS इंफाळ दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित समारंभात ही युद्धनौका सशस्त्र दलात दाखल करण्यात आली. (Defence Minister Rajnath Singh)

सध्या दक्षिण समुद्रातील कुरघोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याने काही शक्ती ईर्ष्या आणि द्वेषाने भरल्या आहेत. अरबी समुद्रातील 'एमव्ही केम प्लुटो'वर नुकताच झालेला ड्रोन हल्ला आणि काही दिवसांपूर्वी लाल समुद्रात 'एमव्ही साईबाबा'वर झालेला हल्ला भारत सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे, असेही मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. (Defence Minister Rajnath Singh)

मैत्रीपूर्ण देशांसोबत मिळून सागरी मार्ग सुरक्षित ठेवू

संपूर्ण हिंदी महासागरात भारत नेट सिक्युरिटी प्रोव्हायडरच्या भूमिका आया प्रदेशातील सागरी व्यापार समुद्रापासून आकाशाच्या उंचीपर्यंत पोहोचेल याची आम्ही खात्री करू. यासाठी मैत्रीपूर्ण देशांसोबत मिळून सागरी व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवू, असे देखील आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी दिले.

INS IMPHAL 'या' सागरी तत्त्वाला बळकट करेल

आयएनएस इम्फाल भारताची वाढती सागरी शक्ती प्रतिबिंबित करते. मला विश्वास आहे की INS IMPHAL इंडो-पॅसिफिक प्रदेशात आमचे "जलमेव यस्य, बालमेव तस्य", म्हणजेच 'ज्याचे पाणी त्याची शक्ती' या तत्त्वाला अधिक बळकट करेल, असे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news