Death Threat To Sharad Pawar: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

Death Threat To Sharad Pawar: शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज जीवे मारण्याची धमकी मिळाली. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याप्रकरणात तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Death Threat To Sharad Pawar) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट केलेल्या संदेशात म्हटले आहे की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. सरकारकडून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. गरज पडल्यास शरद पवार (Death Threat To Sharad Pawar) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात येतील; असे त्यांनी सांगितले.

Death Threat To Sharad Pawar: कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडू – मुख्यमंत्री शिंदे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. राजकारणासाठी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news